सिल्लोड, (प्रतिनिधी) : रहिमाबाद येथील वेशीच्या महाद्वारावरती शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण फटाक्याच्या आतषबाजीत व ढोल ताश्याच्या गजरात उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आले.
सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून रहिमाबाद कडे छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा घेऊन फोर व्हिलर वाहनसहित रॅलीला सुरुवात केली. त्या नंतर फुलंब्री येथील नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तेथील उपनगराध्यक्ष जमीर पठाण, सभापती पवन घोडके, सभापती उमेश दुतोंडे, नगरसेवक जावेद पठाण यांनी पुतळ्यास हार घालून सत्कार केला. त्या नंतर सिल्लोड येथे जिल्हा परिषद सदस्य देविदास पालोदकर, किशोर अग्रवाल, सुधाकर पाटील, शेजुळ, सुरेश बनकर, मनोज मोरेलु, राठोड यांनी सत्कार केला.
या नंतर संध्याकाळी अन्वी गावात सुवासिनींनी महाराजांच्या पुतळ्याचे औक्षण व पूजा केली. तदनंतर रहिमाबाद येथे गावातील सर्व नागरिक, महिला व बालक शिवप्रेमी युवकांनी जल्लोषात छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मिरवणूक काढून स्वागत केले. या वेळी फटाक्याची आतषबाजी मोठ्या प्रमाणावर करून रात्री आठ वाजता अनावरण करण्यात आले.
या वेळी ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक लहू घोडे, पोलिस निरीक्षक मनोज जाधव, बिट जमादार सचिन काळे, सतीश पाटील, पोलीस नाईक संजय आगे, अनंत जोशी, वेजीनाथ चव्हाण, निवृती जाधव, अविनाश तायडे, गावंडे व होमगार्ड सहित या वेळी काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून तगडा बंदोबस्त ठेवला होता. त्याच बरोबर सिल्लोड नगरपालिका चे अग्निशमन दलाचे कर्मचारी अग्निशमन वाहन सहित हजर होते.












